देशात 24 तासांत एक लाख रुग्ण कोरोनामुक्त, नव्या बाधितांच्या संख्येतही घट

देशातील कोरोना संसर्गाबाबत गेल्या चार दिवसांपासून दिलासादायक आकडेवारी समोर येत आहे. नव्या कोरोबाधितांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. मागील 24 तासांत देशभरात एक लाख 2 हजार 70 रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. एका दिवसात रुग्ण बरे होण्याचा हा उच्चांक आहे. याआधी 18 सप्टेंबरला 95 हजार 373 रुग्ण बरे झाले होते.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, काल देशभरात कोरोनाचे 74 हजार 493 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 55 लाख 60 हजार 105 एवढी झाली आहे. तर या 24 तासांत एक हजार 56 जणांनी प्राण गमावले आहेत. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 88 हजार 965 झाली आहे.

चार दिवसांत रुग्णसंख्या घटली
मागील चार दिवसांत सक्रिय रुग्णसंख्या 10 लाख 20 हजारांवरून 9 लाख 75 हजार झाली आहे. 18 सप्टेंबर रोजी देशातील अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 10 लाखांवरून 20 लाख एवढी झाली होती. मात्र चार दिवसांत उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या 45 हजारांची घटली आहे. सध्या देशात 9 लाख 75 हजार 688 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या