हिंदुस्थानने नायजरमधील आपल्या नागरिकांना देश सोडण्यास सांगितलं

हिंदुस्थानने नायजरमधील आपल्या नागरिकांना ‘लवकरात लवकर’ देश सोडण्यास सांगितलं आहे. नायजर हा पश्चिम आफ्रिकेतील एक देश आहे. नायजरचा 80% भाग सहारा वाळवंटाने व्यापला आहे.

केंद्र सरकारने शुक्रवारी आफ्रिकन देश नायजरमधील हिंदुस्थानी नागरिकांसाठी एक सल्ला जारी केला. नागरिकांना ‘लवकरात लवकर’ देश सोडण्यास सांगण्यात आले आहे.

प्रसारमाध्यमांना संबोधित करताना, परराष्ट्र मंत्रालयाचे (MEA) प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले, ‘हिंदुस्थान सरकार नायजरमध्ये सुरू असलेल्या घडामोडींवर बारकाईनं लक्ष ठेवून आहे. सध्याच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, ज्या हिंदुस्थानी नागरिकांची उपस्थिती तिथं अत्यावश्यक नाही त्यांना शक्य तितक्या लवकर देश सोडून जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.’

‘त्यांनी लक्षात ठेवावे की हवाई क्षेत्र सध्या बंद आहे. जमिनी मार्गानं जाताना, सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी अत्यंत सावधगिरी बाळगली जाऊ शकते. जे आगामी काळात नायजरला जाण्याची योजना आखत असतील त्यांना देखील त्यांच्या प्रवासाच्या योजनांचा पुनर्विचार करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.’, तो पुढे म्हणाला.

नायजरमध्ये किती हिंदुस्थानी नागरिक आहेत असे विचारले असता मंत्री म्हणाले, ‘जवळजवळ 250 नागरिक आहेत’.

ते पुढे म्हणाले, ‘या सर्वांनी नोंदणी करावी अशी आमची इच्छा आहे. आम्हाला सांगण्यात आले आहे की ते सुरक्षित आहेत. हिंदुस्थान दूतावास त्यांना देश सोडून जाण्यासाठी रसद पुरवण्याचा प्रयत्न करत आहे’.

बागची यांनी पुढे नमूद केलं की, ‘विमान वाहतूक बंद आहे आणि भू मार्गानं सीमा ओलांडून जाणं कठीण आहे. परंतु आम्ही शक्य ते सर्व प्रयत्न करत आहोत.’