IND vs AUS मिचेल स्टार्कच्या ‘पंजा’ समोर, हिंदुस्थानी संघ 117 धावांवर गारद

हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना विशाखापट्टणम येथे खेळला जात आहे. हिंदुस्थान विरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र या सामन्यात मिचेल स्टार्कने गोलंदाजीमध्ये आपला दबदबा दाखवत 5 विकेट घेतल्या. त्यामुळे हिंदुस्थानी संघ केवळ 26 षटकांत 117 धावा करून ऑलआऊट झाला. हिंदुस्थानकडून विराट कोहलीने सर्वाधिक 31 धावा केल्या. हिंदुस्थानने ऑस्ट्रेलियासमोर 118 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने सर्वाधिक 5 बळी घेतले. तर शॉन अ‍ॅबॉटने तीन आणि नॅथन एलिसने दोन बळी घेतले.