हिंदुस्थानी संघ दबावाखाली, झटपट गमावले सुरूवातीचे गडी

सामना ऑनलाईन, बंगळुरु
ऑस्ट्रेलियाने हिंदुस्थानला पहिल्या डावात १८९ धावांत रोखल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव २७६ धावांमध्ये गुंडाळण्यात हिंदुस्थानला यश आले आहे. ऑस्ट्रेलियाने ८७ धावांची आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियाने रविवारी २३८ धावांपर्यंत मजल मारली होती. सोमवारी ऑस्ट्रेलियाचा संघ कालच्या धावसंख्येत फक्त ३९ धावांची भर घालू शकला. रवींद्र जाडेजाने उत्तम गोलंदाजी करत ६ बळी टीपले. आर.अश्विनने २ तर इशांत शर्मा आणि उमेश यादव या दोघांनी प्रत्येकी एक बळी टीपला

हिंदुस्थानी संघाला सामना जिंकण्यासाठी मोठी धावसंख्या उभारावी लागणार आहे. हिंदुस्थानी संघाने दुसरा डाव सुरू केला आणि ऑस्ट्रेलिया संघाना अभिनव मुकुंदचा बळी घेत संघाला सुरूवातीलाच हादरा दिला., पहिल्या डावात अर्धशतक झळकावणाऱ्या लोकेश राहुलने या डावातही अर्धशतक झळकावलं. मात्र त्यानंतर तो देखील लगेच तंबूत परतला. पुणे कसोटीमध्ये निराशाजनक कामगिरी केलेल्या कर्णधार विराट कोहलीला दुसऱ्या डावातही सूर गवसला नाही. कोहली १५ धावा करून परतला, त्याला हॅझलवूडने पायचीत केलं. दुसऱ्या डावामध्ये जर हिंदुस्थानी संघाने मोठी धावसंख्या उभारली नाही तर मग बंगळुरू कसोटीमध्येही त्यांना पराभव स्वीकारावा लागण्याची दाट शक्यता आहे.

आपली प्रतिक्रिया द्या