Honda Activa 6G लवकरच हिंदुस्थानात होणार लॉन्च; हे असतील फीचर्स…

1840

दुचाकी निर्माता कंपनी होंडा लवकरच आपल्या अ‍ॅक्टिव्हाची पुढची आवर्ती Honda Activa 6G हिंदुस्थानी बाजारात लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. नवीन Honda Activa 6G हिंदुस्थानात 15 जानेवारी रोजी लाँच केली जाईल. नवीन स्कूटर नवीन फीचर्ससह नवीन स्पेसिफिकेशनसह सुसज्ज असेल. आज आम्ही तुम्हला या स्कुटरच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन बद्दल सांगणार आहोत.

इंजिन आणि पॉवर

Honda Activa 6G मध्ये 109.19 सीसी बीएस 6 इंजिन दिले जाईल. जे 7.96 पीएस पॉवर आणि 9 एनएम टॉर्क जनरेट करते. ही स्कूटर पूर्वीपेक्षा अधिक पॉवरफुल्ल असेल.

फीचर्स

Honda Activa 6G मध्ये नवीन स्टॉप सिस्टम, इंधन इंजेक्शन तंत्रज्ञान, ब्लूटूथ स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी फीचर्स, डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल दिले जाऊ शकते.

ब्रेकिंग सिस्टिम

या स्कूटर मध्ये फ्रंट डिस्क ब्रेक आणि मागील बाजूस ड्रम ब्रेक मिळतील आणि स्कूटर सीबीएसने सुसज्ज असेल.

किंमत

Honda Activa 6G ची किंमत आधीच्या मॉडेलपेक्षा 5000-8000 रुपये जास्त असू शकते. होंडा अ‍ॅक्टिवा 5 जी ची किंमत सध्या 55934 रुपये ( एक्स-शोरूम) आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या