अपंगांची टी-20 क्रिकेट स्पर्धा  :  ‘टीम इंडिया’ला जगज्जेतेपद

183

 ‘टीम इंडिया’ने अपंगांच्या ट्वेण्टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत यजमान इंग्लंडचा धुव्वा उडवून जगज्जेतेपदाच्या करंडकावर आपले नाव कोरले. हिंदुस्थानने किताबी लढतीत 36 धावांनी बाजी मारल्यामुळे इंग्लंडला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. रवींद्र संतेचे दमदार अर्धशतक आणि कुणाल फणसेची अष्टपैलू कामगिरी ही हिंदुस्थानच्या विजयाची वैशिष्टय़े ठरली.

हिंदुस्थानकडून मिळालेल्या 182 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडला 9 बाद 144 धावसंख्येपर्यंतच मजल मारता आली. तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना हिंदुस्थानने 20 षटकांत 7 बाद 180 अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. रवींद्र संतेने 34 चेंडूंत 4 षटकार व 2 चौकारांच्या साहाय्याने 53 धावा फटकावल्या.

आपली प्रतिक्रिया द्या