अझलन शाह हॉकी – हिंदुस्थानने जपानला ४-३ने धूळ चारली

साभार-हॉकी इंडिया

सामना ऑनलाईन । इपोह

सुलतान अझलन शाह हॉकी स्पर्धेत हिंदुस्थाननं चौथ्या सामन्यात जपानला ४-३ ने धूळ चारत स्पर्धेतील दुसरा विजय मिळवला. हिंदुस्थानकडून मनदिप सिंहनं ३, तर रूपेंदरपाल सिंहनं एक गोल केला

सामन्याच्या सुरूवातीपासून दोन्ही संघांनी एकमेकांच्या गोलपोस्टवर आक्रमण केलं. मात्र हिंदुस्थानचा डिफेंडर रूपेंदरपाल सिंहनं पहिला गोल आघाडी मिळवून दिली. त्यानंतर मनदिप सिंहनं जादुई कामगिरीचं प्रदर्शन करत तिसऱ्या आणि चौथ्या सत्रात गोल करत हॅट्रिक साधली. एकवेळ जपाननं हिंदुस्थानच्या पोस्टवर आक्रमन करत ३-२ अशी आघाडी घेतली होती. मात्र मनदिपनं हिंदुस्थानकडून तिसरा आणि वैयक्तिक दुसरा गोल करत ३-३ अशी बरोबरी साधून दिली. शेवटच्या सत्रातही मनदिप सिंहनं आपला आक्रमक खेळ जारी ठेवत गोल करत हिंदुस्थानला ४-३ असा विजय मिळवून दिला.


याआधी, मंगळवारी पाच वेळचा चॅम्पियन हिंदुस्थानचा नऊ वेळचा चॅम्पियन ऑस्ट्रेलियानं ३-१ असं पराभव केला होता.