#INDvNZ हिंदुस्थानी महिलांची हॅटट्रीक, न्यूझीलंडचा पराभव करत उपांत्य फेरित दाखल

663

हिंदुस्थानच्या महिला क्रिकेट संघाने टी-20 वर्ल्ड कपमध्ये विजयाची हॅटट्रीक घेतली आहे. गतविजेत्या ऑस्ट्रेलिया व बांग्लादेशला हरविल्यानंतर हरमनप्रीत कौरच्या हिंदुस्थानी संघाने न्यूझीलंडचा देखील पराभव केला आहे. न्यूझीलंडचा निसटता पराभव झाला असला तरी टीम इंडिया उपांत्य फेरित दाखल झाली आहे. अशाने या विश्वचषकात उंपात्य फेरित दाखल होणारी टीम इंडिया हा पहिला संघ ठरला आहे.

हिंदुस्थानने न्यूझीलंडसमोर 134 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ 20 षटकात 129 धावाच बनवू शकला. हिंदुस्थानच्या या विजयात सलामी फलंदाज शेफाली वर्मा हिचा मोठा वाटा आहे. शेफालीने धमाकेदार 46 धावा केल्या त्यासाठी तिला प्लेयर ऑफ द मॅच पुरस्कार देखील मिळाला.

आपली प्रतिक्रिया द्या