शास्त्रज्ञांचे प्रयत्न सुरु, लवकरच तयार होईल कोरोनाची लस – नितीन गडकरी

nitin-gadkari
नितीन गडकरी

केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे गुजरात जनसंवाद रॅलीला संबोधित केले. यावेळी ते म्हणाले की, ‘कोरोना साथीचा रोग फार काळ टिकणार नाही. आपल्या देशासह आणि इतर देशांतील शास्त्रज्ञही कोरोना लस तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. मला विश्वास आहे की ही लस लवकरच तयार केली जाईल’, असं ते म्हणाले आहेत.

या रॅलीला संबोधित करताना गडकरी चीन आणि पाकिस्तानबद्दलही बोलले आहेत. ते म्हणाले की, आपल्या एका बाजूला पाकिस्तान तर दुसऱ्या बाजूला चीन आहे. आम्हाला शांती आणि अहिंसा हवी. भूतान आणि बांगलादेशच्या भूमी व्यापण्याचा विचार आम्ही कधीही केला नाही. आम्हाला पाकिस्तान आणि चीनची भूमीही नको.आम्हाला फक्त शांती हवी, असे ते म्हणाले आहेत.

दरम्यान देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. देशात आतापर्यंत 3.2 लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. ज्यातील 9207 रुग्णाचा मृत्यू झाला असून 1.63 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच 1.5 लाख रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या