हिंदुस्थानने श्रीलंकेला २०५ धावांत गुंडाळले

सामना ऑनलाईन । नागपूर

नागपूर कसोटीच्या पहिल्याच दिवशी हिंदुस्थानच्या गोलंदाजांनी श्रीलंकेला अवघ्या २०५ धावांत गुंडाळले. लंकेचा संपूर्ण संघ ७९.१ षटकांत तंबूत परतला. रविचंद्रन अश्विनने सर्वाधिक ४ तर इशांत शर्मा आणि रवींद्र जाडेजाने प्रत्येकी ३ बळी घेतले.

नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेणाऱ्या लंकेला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले. सलामीवीर दिमथ करुणारत्नेने ५१ धावांची खेळी केली तर कर्णधार दिनेश चंडीमलने ५७ धावा केल्या. बाकीचे फलंदाज झटपट बाद झाले.

तीन कसोटी सामन्यांची मालिका

हिंदुस्थान-श्रीलंका यांच्यात तीन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. कोलकाता येथे झालेली पहिली कसोटी अनिर्णित राहिली. नागपूरमध्ये दुसरी कसोटी सुरू आहे.

गांगुलीने केले कोहलीचे समर्थन

हिंदुस्थानचा कर्णधार विराट कोहलीने क्रिकेटच्या व्यस्त कार्यक्रमावर केलेल्या टीकेला माजी कर्णधार सौरव गांगुलीने पाठिंबा दर्शवला आहे. टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेसारख्या आव्हानात्मक दौऱ्याच्या तयारीसाठी पुरेशा वेळेची आवश्यकता होती असे गांगुलीने सांगितले. क्रिकेटच्या व्यस्त कार्यक्रमामुळे दक्षिण आफ्रिकेसारख्या आव्हानात्मक दौऱ्याच्या तयारीसाठी पुरेसा वेळ मिळाला नसल्याची तक्रार विराट कोहलीने केली होती. त्यानंतर बीसीसीआयने विराटच्या तक्रारीवर गंभीरपणे विचार करणार असल्याचे स्पष्ट केले होते.

आपली प्रतिक्रिया द्या