मितालीचा विश्वचषकामध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम हुकला

24

सामना ऑनलाईन । लंडन

महिला विश्वचषकाचा अंतिम सामना हिंदुस्थान आणि यजमान इंग्लंडमध्ये सुरू आहे. या सामन्यात हिंदुस्थानची कर्णधार मिताली राज १७ धावा करून बाद झाली. त्यामुळे तिचा महिला विश्वचषक २०१७ मध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम थोडक्यात हुकला. मिताली राजने आणखी ३ धावा केल्या असत्या तर तिच्या नावावर यंदाच्या विश्वचषकामध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम जमा झाला असता.

मितारी राजने यंदा विश्वचषकामध्ये ४०८ धावा केल्या असून, इंग्लंडच्या टॅमी बाउमेंटने सर्वाधिक ४१० धावा केल्या आहे. टॅमीचा हा सर्वाधिक धावांचा विक्रम मोडण्याची संधी मितालीकडे होती. मात्र फक्त तीन धावा कमी पडल्या. मिताली राज खालोखाल ऑस्ट्रेलियाच्या अॅलिस पेरीने ४०४ धावा केल्या आहेत, तर इंग्लंडच्याच सारा टेलरने ३९६ आणि नताली स्काईव्हरने ३६९ धावा केल्या आहेत.

मिताली राजने संपूर्ण विश्वचषकामध्ये आपल्या फलंदाजीच्या जोरावर हिंदुस्थानला अंतिम सामन्यापर्यंत पोहचवण्यात महत्त्वाची भूमिका निभावली आहे. विश्वचषकामध्ये मितालीने ४९.०० च्या सरासरीने धावा ठोकल्या आहेत. यात तिच्या ३ अर्धशतकांचा आणि एका शतकाचा समावेश आहे.

आपली प्रतिक्रिया द्या