ट्रम्प खोटं बोलले ? मोदींसोबत चर्चाच झाली नसल्याचा परराष्ट्र मंत्रालयाचा खुलासा

955

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात गेल्या काही दिवसांत कोणत्याही स्वरुपाची चर्चा झाली नसल्याचा खुलासा परराष्ट्र मंत्रालयाने केला आहे.

ट्रम्प यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना आपण मोदींशी बोललो असल्याचा दावा केला होता. चीन आणि हिंदुस्थानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आपले संभाषण झाले होते असं ट्रम्प यांचं म्हणणं होतं.

लडाखच्या गलवान घाटीवर चीनने मिळवला ताबा; हिंदुस्थानला धमकी देत दर्पोक्ती

तणाव निवळावा यासाठी आपण दोन देशांमध्ये मध्यस्थी करायला तयार असल्याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला होता. परराष्ट्र मंत्रालयाने मात्र 4 एप्रिल नंतर या दोन्ही नेत्यांमध्ये कोणतंही संभाषण झालं नसल्याचा खुलासा केला आहे.

सामना अग्रलेख – चीनची खुमखुमी! ट्रम्पचा विनोद!!

चीन आणि हिंदुस्थानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा आपण मध्यस्थीसाठी तयार असल्याचे म्हटले आहे. ट्रम्प यांनी सांगितले की त्यांनी याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बातचीत केली आहे. मोदी यांचा मूड चांगला नाहीये असा दावा त्यांनी केला होता. ट्रम्प यांनी गुरुवारी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की “हिंदुस्थान आणि चीनमध्ये मोठा झगडा निर्माण झाला आहे.प्रचंड लोकसंख्या आणि ताकदवान सैन्य असलेले हे दोन देश आहेत. हिंदुस्थान खूश नाहीये आणि कदाचित चीनही खूश नाहीये. मी पंतप्रधान मोदी यांच्याशी बोललोय ते जे काही चालले आहे (हिंदुस्थान-चीनमधील तणाव) त्यामुळे चांगल्या मूडमध्ये नाहीयेत.” बुधवारी ट्रम्प यांनी या वादामध्ये मध्यस्थी करण्याची तयारी दर्शवली होती. त्यांनी या संदर्भात केलेल्या ट्विटबाबत छेडले असता ट्रम्प म्हणाले की जर हिंदुस्थान आणि चीनला मध्यस्थीमुळे मदत होईल असे वाटत असेल तर मी नक्की मध्यस्थी करेन. हिंदुस्थान आणि चीनमध्ये सीमारेषेवर तणाव वाढला असून अमेरिका या प्रकरणी मध्यस्थी करायला तयार असल्याचे आपण या दोन्ही देशांना कळवले असल्याचेही ट्रम्प यांनी सांगितले. हिंदुस्थानने अमेरिकेच्या मध्यस्थीबाबत गुरुवारीच भूमिका स्पष्ट केली होती की हा वाद ते सामंजस्याने आणि शांततेने सोडवण्याचा प्रयत्न करत आहे.

परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी सांगितले की दोन्ही देश हे सैन्य दलाच्या आणि दूतावासाच्या पातळीवर हा वाद कसा सोडवता येईल यासाठी प्रयत्न करत आहेत. आम्ही याच मार्गांनी वाद सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दोन्ही देशांचे फिल्ड कमांडर्स हे प्रत्यक्ष भूमीवर चर्चा करून वाद निवळण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. चीननेही तडजोडीचा सूर आळवला असून दोन्ही देशांना एकमेकांचा धोका नसून या दोन्ही देशांनी संवादाच्या माध्यमातून मतभेद दूर केले पाहिजेत.

आपली प्रतिक्रिया द्या