चिनी सैन्याची अखेर माघार, एलएसीवरून 1 किमी मागे हटले

905

मे महिन्यापासून हिंदुस्थान आणि चीनमध्ये सुरू असलेल्या सीमावाद प्रकरणी आता मोठी बातमी समोर आली आहे. 15 जून रोजी ज्या ठिकाणी दोन्ही देशांचं सैन्य समोरासमोर आलं होतं तिथून आता चिनी सैन्याने माघार घेतली आहे. सैनिकांनी माघार घेण्यावरून दोन्ही सैन्यांदरम्यान मंथन सुरू होते, अशा परिस्थितीत या प्रक्रियेचा हा पहिला महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) चीनी सैन्य गलवान व्हॅलीमधील हिंसाचाराच्या ठिकाणापासून सुमारे एक किमी अंतरापर्यंत त्यांनी माघार घेतली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, दोन्ही देशांच्या सैन्याने हिंसाचार झालेल्या स्थळापासून सैन्य मागे घेण्यावर एकमत झाले आहे. आता कोणत्याही प्रकारच्या हिंसाचाराच्या घटना घडू नयेत म्हणून आता गलवान खोऱ्याजवळ बफर झोन तयार करण्यात आला आहे.

चिनी सैन्याने आपले तंबू, गाड्या आणि सैनिक मागे टाकण्यास सुरवात केली आहे. कॉर्प्स कमांडर स्तरावरील बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सैन्याच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चिनी सैन्य सुमारे एक किमी अंतरापर्यंत मागे गेले आहेत. जो भाग हिंदुस्थानमधून दिसतो. चीनने आपले सैन्य आणि सामग्री गलवान खोऱ्यात बरेच मागे घेतली आहे. यानंतर दोन्ही सैन्यात आणखी चर्चा होऊ शकते.

आपली प्रतिक्रिया द्या