हिंदुस्थान-चीनमधील तणावाचा फटका बीसीसीआयला बसणार, कोटय़वधी रुपयांच्या महसूलावर पाणी सोडावे लागणार

205
bcci-logo

हिंदुस्थान-चीन यांच्यामध्ये लडाख येथे झालेल्या चकमकीत हिंदुस्थानचे जवान शहीद झाले. त्यानंतर समस्त हिंदुस्थानात चीनविरोधी नारा घुमू लागला. त्यांच्या वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मागणी जोर धरू लागली. अशाप्रसंगी बीसीसीआयला मात्र आपल्या महसूलाची चिंता सतावू लागली आहे. पण तरीही चिनी मालाला हिंदुस्थानात नो एण्ट्री करण्यात आली, तर हिंदुस्थान – चीनमधील तणावाचा फटका बीसीसीआयला बसणार हे निश्चित झाले आहे. व्हीवो, ओप्पो, वन प्लस, रिअलमी, श्योमी या विविध चिनी कंपन्याकडून बीसीसीआयला विविध स्तरावर कोटय़वधी रूपयांची कमाई करता येते. यापुढे चिनी कंपन्यासोबत करार कायम ठेवायचा की नाही याबाबत अंतिम निर्णय बीसीसीआय लवकरच घेणार आहे.

पाच वर्षांचा करार

व्हीवो ही चीनी कंपनी आयपीएल या स्पर्धेची मुख्य स्पॉन्सर आहे. 2018 सालापासून त्यांचा बीसीसीआयसोबत करार करण्यात आला आहे. हा करार पाच वर्षांचा आहे. या कराराद्वारे बीसीसीआयला वर्षाला 440 कोटी रूपये मिळतात.

आपली प्रतिक्रिया द्या