‘डिजिटल स्ट्राईक’नंतर चिनी माकडांचे डोळे उघडले, एकमेकांच्या अर्थव्यवस्थेचे ‘आधार’ असल्याचे सूर

6322

सीमेवर तणावाचे वातावरण असताना हिंदुस्थानने चीनला धडा शिकवण्यासाठी सुरुवातीला 59 आणि नंतर 47 अशा एकूण 106 एप्सवर बंदी घालून ‘डिजिटल स्ट्राईक’ केला. तसेच रंगीत टीव्हीच्या आयातीवर देखील बंदी घातली. यासह एलएसीवर जशास-तसे धोरण स्वीकारत हत्यार व अतिरिक्त जवानांची कुमक तैनात करण्याचा निर्णय घेतला. हिंदुस्थानच्या या ताठर भूमिकेमुळे चीनने मवाळ धोरण स्वीकारले आहे. चीनचे राजदूत सुन वीडॉन्ग यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

दिल्लीत हिंदुस्थान-चीन संबंधावर आधारित ‘इंस्टीट्यूट ऑफ चाइनीज स्टडीज’ तर्फे बोलताना चीनचे राजदूत सुन वीडॉन्ग म्हणाले की दोन्ही देश एकमेकांच्या अर्थव्यवस्थेचे आधार आहेत. यामुळे कोणा एकाला जरी नुकसान झाले तरी त्याचा फटका दुसऱ्यालाही बसणार. एकमेकांवर अवलंबून असणारी अर्थव्यवस्था बळजबरीने विभक्त केल्यास यामुळे फक्त नुकसानच होऊ शकते, असे सुन वीडॉन्ग म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, हिंदुस्थानात 2018-19 या आर्थिक वर्षात 92 टक्के कॉम्प्युटर, 82 टक्के टीव्ही, 80 टक्के ऑप्टिकल फायबर आणि 85 टक्के मोटारसायकल पार्ट चीनमधून आयात झाले आहे. यावरून व्यापार ग्लोबलायजेशनचे महत्व अधोरेखित होते. तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी यास बदलणे शक्य नाही, असेही ते म्हणाले.

चीनची अद्याप माघार नाही
दरम्यान, हिंदुस्थानने चीनचे सैन्य पूर्व लदाखमधून पूर्णपणे मागे हटल्याचा दावा फेटाळला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी स्पष्ट केले की लडाखमध्ये सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. तसेच कमांडर लेव्हलची चर्चा सुरू राहील व चीन सीमेवर शांतता राखण्यासाठी गंभीरतेने सैन्य मागे घेईल असेही परराष्ट्र मंत्रालयाचे सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या