चीनसोबत तणाव वाढल्यास ट्रम्प हिंदुस्थानला पाठिंबा देतील याचा भरवसा नाही, माजी ‘एनएसए’चा खुलासा

1789

लडाख सीमेवर चीनसोबत तणाव वाढत असताना अमेरिका हिंदुस्थानच्या बाजूने असल्याचे दिसून आले. मात्र तणाव शिगेला पोहोचल्यावर ट्रम्प काय भूमिका घेतील आणि हिंदुस्थानला पाठिंबा देतील की नाही याचा काही भरवसा नाही, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पोम्पियो यांनी उघडपणे हिंदुस्थानची बाजू घेतली होती.

दरम्यान, एका टीव्ही चॅनेलशी बोलताना जॉन बोल्टन यांनी अमेरिका, हिंदुस्थान आणि चीन या देशांमधील सध्याच्या तणावाच्या स्थितीवर विधान केले. चीन आपल्या सीमेवर आक्रमक स्वरूप धारण करत असून दक्षिण चीन समुद्र आणि जपान, हिंदुस्थान व अन्य देशांसोबत चीनचे संबंध सध्या खराब आहेत. यावेळी चीनविरोधात ट्रम्प हिंदुस्थानचे समर्थन करतील का? असे त्यांना विचारण्यात आले असता ते म्हणाले की, मला पक्के माहिती नाही आणि कदाचित त्यांनाही माहिती नसेल. ट्रम्प व्यापाराच्या चष्मातून सर्व पाहतात असेही ते म्हणाले.

… तर हिंदुस्थानच्या मदतीला सैन्य उतरवू, अमेरिकेचा चीनला थेट इशारा

नोव्हेंबरमध्ये राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक झाल्यावर ट्रम्प काय करतील माहिती नाही. कदाचित चीनसोबत मोठे व्यापारी करार करू शकतात. हिंदुस्थान आणि चीनमध्ये तणाव वाढल्यास ते कोणाचे समर्थन करतील माहिती नाही. ट्रम्प हिंदुस्थानला पाठिंबा देतीलच याचा काही भरवसा नाही, असेही ते म्हणाले. तसेच ट्रम्प यांना हिंदुस्थान-चीनमधील तणावाचा इतिहास माहिती नाही, असेही ते म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या