अशी झाली चीन सीमेवर हाणामारी, आणखी एक व्हिडीओ व्हायरल

642

पूर्व लडाखच्या गलवान खोऱयात 15 जून रोजी तब्बल 45 वर्षांनी हिंसक संघर्ष झाला. चिनी लाल माकडांनी खिळे लावलेले लोखंडी रॉड आणि दगडांनी अचानक केलेल्या हल्ल्यात कर्नल संतोष बाबू यांच्यासह 20 जवान शहीद झाले. हिंदुस्थानी जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यात चीनचे 43 सैनिक ठार झाले. आठ दिवसांनंतर आज चीनच्या सैन्याने त्यांचा कमांडिंग ऑफिसर मारला गेल्याची कबुली दिली आहे. दुर्गम भागात असलेल्या गलवान खोऱयात 15 जूनला काय घडले? याचा आता दुसरा व्हिडीओ हाती लागला आहे.

कमांडिंग ऑफिसरसह काही सैनिक ठार झाल्याची चीनची कबुली

लडाखच्या गलवान खोऱयातील हिंसक संघर्षानंतर पहिल्यांदाच चीनने आपले सैनिक ठार झाल्याचे मान्य केले आहे. चीनने कमांडिंग ऑफिसरसह 20 पेक्षा कमी सैनिक मारले गेले असल्याचे सांगितले आहे. दोन्ही देशांतील लष्करी स्तरावरील चर्चेदरम्यान चीनने ही कबुली दिल्याचे वृत्त आयएएनएस या वृत्तसंस्थेने दिले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या