चिनी माकडे, पाकड्यांचा दुहेरी धोका; सीमा रेषेवर लष्कर सतर्क

1205

चीनसोबत लडाखमध्ये सीमारेषेवरून तणाव वाढत असतानाच पाकिस्तानही कुरापती करण्याच्या तयारीत आहे. सीमारेषेजवळ पाकिस्तानच्या हालचालीतही वाढ झाली आहे. लष्कराने संभाव्य धोका ओळखून पश्चिमी म्हणजे पाकिस्तानच्या सीमेवर तैनात असलेल्या जवानांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. चीनसोबत एलएसीवर नजर ठेवण्यासोबतच जवानांना पाकिस्तानच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे संभाव्य दुहेरी धोका टाळता येणार आहे. चिनी माकडे आणि पाकड्यांचे दुहेरी संकट आले तरी त्या परिस्थितीशी मुकाबला करण्यास हिंदुस्थानी सैन्यदलाचे जवान सज्ज असल्याचे सांगण्यात आले.

आपल्या शेजारी असलेल्या पाकिस्तान आणि चीन आगामी काळात देशाला धोका निर्माण करू शकतात, असा अंदाज संरक्षण क्षेत्राशी संबंधित संसदीय स्थायी समितीच्या अहवालात नमूद करण्यात आला आहे. हवाई दलाच्या एका अधिकाऱ्याने 2014 मध्ये ही माहिती समितीला देण्यात आली होती. हिंदुस्थानचा चीनशी तणाव वाढल्यास पाकिस्तानच्याही कुरापती सुरू होतील, असे अधिकाऱ्याने स्पष्ट केले होते. तसेच हिंदुस्थआना चीनशी तणाव वाढण्याची पाकिस्तान वाट पाहत आहे, दोन्ही देशात तणाव वाढवून कुरापती करण्याची संधी पाकस्तान शोधत आहे. मात्र, हिंदुस्थान, पाकिस्तानात तणाव वाढल्यास चीनकडून प्रत्यक्ष धोका नसला तरी चीन पाकिस्तानला छुपी मदत पुरवण्याची शक्यताही वर्तवण्यात आली होती.

ही सर्व परिस्थिती पाहता देशाला दुहेरी संकटाचा सामना करावा लागण्याची स्थिती आहे. पाकिस्तान आणि चीनच्या हालचालींवर देखरेख ठेवणाऱ्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, सध्या दुहेरी युद्धाची शक्यता नाही. मात्र, सीमारेषेवर दोन्ही देशांसोबत तणाव आहे. त्यामुळे असे दुहेरी संकट उभे ठाकले तरी आपले सैन्यदल त्यांना धडा शिकवण्यास सक्षम असल्याचा विश्वास अधिकाऱ्याने व्यक्त केला. तीन अण्वस्त्रसज्ज देशांमध्ये एकाचवेळी युद्धाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता कमी आहे. मात्र, चीन आणि पाकिस्तानच्या मैत्रीमुळे हिंदुस्थानला दुहेरी संकटाचा मुकाबला करण्यास सज्ज असले पाहिजे. सध्याच्या परिस्थितीचा विचार करता, लडाखमधील जवान, नौदल, हवाई दलासोबतच पाकिस्तानच्या सीमेवर असलेल्या जवानांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आल्याचे अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या