हिंदुस्थान-चीन सीमावादात मध्यस्थी करण्यास तयार – डोनाल्ड ट्रम्प

1637

हिंदुस्थान आणि चीनचे सैन्य लडाखमध्ये समोरासमोर उभे ठाकले आहे. डोकलाम वादानंतर पहिल्यांदा दोन्ही सैन्य 20 दिवसापेक्षा अधिक काळ आमनेसामने आल्याने सीमारेषेवर तणाव निर्माण झाला आहे. अशातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंदुस्थान आणि चीन सीमा वादात मध्यस्थी करण्यास तयार असल्याचे म्हटले आहे.

लडाखच्या पँगोंग त्सो तलावाजवळच्या भागात हिंदुस्थान आणि चीनने आपापला फौजफाटा वाढवला आहे. त्यामुळे तणाव वाढत आहे. पंतप्रधान मोदी यांची तिन्ही सैन्य दलाच्या प्रमुखांसोबत बैठकही झाली. त्यानंतर लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी टॉपच्या अधिकारी आणि कमांडर सोबत बैठक घेतली. याच दरम्यान दुपारी 5 च्या दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट कर दोन्ही देशाच्या वादात मध्यस्थी करण्यास आपण तयार असल्याचे म्हटले आहे.

img-20200527-wa0015

याआधीही डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंदुस्थान आणि पाकिस्तान सीमावाद आणि कश्मीर मुद्द्यावर मध्यस्थी करण्यास तयार असल्याचे म्हटले होते. मात्र हिंदुस्थानने हा दोन देशातील प्रश्न असून तिसऱ्याची मध्यस्थी नको अशी भूमिका घेतली होती. आता पुन्हा एकदा ट्रम्प यांनी मध्यस्थीचा मुद्दा उपस्थित केला आहे.

एक इंचही मागे हटणार नाही, हिंदुस्थानचा चीनला इशारा; ‘जशास तसे’ उत्तर देणार

आपली प्रतिक्रिया द्या