सावधान हिंदुस्थान, लडाखमध्ये चीन एकटा नाही; पाकिस्तानचीही मिळाली साथ

6131

पूर्व लडाखमध्ये गलवान खोरे आणि पेग्यांग सरोवर परिसरात चीनने डेरा टाकल्यानंतर हिंदुस्थानने याचा कडाडून विरोध केला. याचाच परिणाम 15 जूनच्या हिंसल झटापटीत झाला. चीन एलएसीवर हिंदुस्थानला डोळे वटारत असताना त्याचा ‘जिगरी मित्र’ पाकिस्तानची याचा फायदा घेत हिंदुस्थानला अधिक कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे हिंदुस्थानच्या जवानांना चीनसह पाकिस्तानच्या चालबाजीकडेही लक्ष ठेवावे लागत आहे.

‘नवभारत टाइम्स’ने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, चीनची वायुसेना पीएलएएएफचे एक एअरक्राफ्ट पाकिस्तानच्या ताब्यात असणाऱ्या (पीओके) स्कर्दू येथे लँड झाले होते. त्यामुळे हिंदुस्थान चीनच्या लडाखमधील स्थितिसह पीओकेमधील पाकिस्तानच्या एअरबेसवर देखील लक्ष ठेऊन आहे. पीओकेमधील स्कर्दू हिंदुस्थानच्या लेहमधील एअरबेस पासून फक्त 100 किलोमीटर अंतरावर आहे. पाकिस्तानने नुकतेच येथे निर्माणकार्य केले होते. चीन पीओकेमधील एअरबेसचा वापर करू शकतो त्यामुळे हिंदुस्थानच्या लष्करासह वायुसेना सतर्क झाली आहे.

एअरफोर्स अलर्ट मोडवर
चीनसोबत लडाखमध्ये झालेल्या हिंसक झटापटीपासून हिंदुस्थानच्या वायुसेनेने लडाख भागात आपल्या हालचाली वाढवल्या आहेत. या भागात अतिरिक्त जवान तैनात करण्यासाठी आणि त्यांना रसद पोहोचवण्यासाठी वायुसेनेने कंबर कसली आहे. तसेच एलएसीवर बरील नजर ठेवण्यासाठी सुखोई-30 आणि मिग-29 लढाऊ विमान लडाखच्या आकाशात घिरट्या घालताना दिसले. यासह अपाचे आणि चिनुक हेलिकॉप्टर देखील मैदानात उतरले आहेत. चीनने एलएसी पासून जवळ असणाऱ्या एअरबेसवर लढाऊ विमान तैनात केल्याचे सॅटेलाईट इमेजद्वारे स्पष्ट झाल्यापासून वायुसेना अधिक सतर्क झाली आहे. काही दिवसांपूर्वी वायुसेना प्रमुख एअर चीफ मार्शल भदौरिया यांनी या भागाचा दौरा केला होता.

सामना अग्रलेख – चीनशी कोणी लढायचे?

आपली प्रतिक्रिया द्या