हिंदुस्थानातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 35 हजारांच्या पार तर मृतांचा आकडा 1,152 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासात देशात 1993 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 77 जणांचा मृत्यू झाला आहे. कालपासून तब्बल 659 जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत 9065 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आरोग्य मंत्रालयाचे सह ,सचिव लव्ह अग्रवाल यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली. In the last 24 hours, 1993 positive cases reported; the total number of positive cases is now 35,043: Lav Agrawal, Joint Secy, Health Ministry pic.twitter.com/F2oP1zpTEM — ANI (@ANI) May 1, 2020 या पत्रकार परिषदेत देशातील कोरोना विरोधातील लढ्यासाठी लागणारा औषधांचा साठा, उपचाराची उपकरणं, मास्क ग्लोव्हज यांच्या उपलब्धतेबाबतही माहिती दिली. 'देशात सध्या 2.01 कोटी पीपीईची गरज आहे. सरकारने 2.2 कोटी पीपीई किटची ऑर्डर दिली आहे. 1.42 कोटी पीपीई किट हे बाजारात वितरित झाले आहेत. तर 1.87 कोटी पीपीई किट तयार करण्याचे काम सुरू आहे. आपल्याला सध्या 75 हजार व्हेंटिलेटर्सची गरज असून 13,398 व्हेंटिलेटर्स तयार असून 60 हजार व्हेंटिलेटर्सची ऑर्डर देण्यात आली आहे. तसेच 2.49 कोटी एन95 मास्कची ऑर्डरही देण्यात आली आहे', असे एमपावर्ड ग्रुप 3 चे अध्यक्ष पीडी वाघेला यांनी या पत्रकार परिषदेत सांगितले.