गुड न्यूज! हिंदुस्थानने अमेरिकेला केले ओव्हरटेक, कोरोना रुग्णांच्या रिकव्हरी रेटमध्ये जगात ‘नंबर वन’

प्रातिनिधिक फोटो

हिंदुस्थानमध्ये दररोज 90 हजारांहून कोरोना रुग्ण सापडत असले, तर दिलासादायक म्हणजे मोठ्या प्रमाणात रुग्ण बरेही होत आहेत. देशात गेल्या 254 तासात 95 हजार 885 नवीन रुग्ण सापडले, तर 93 हजार 337 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. कोरोना बाधितांचा आकडा 53 लाखांवर पोहोचला असला तरी जवळपास 42 लाख रुग्ण योग्य उपचारानंतर बरे होऊन घरी गेले आहेत. जगात आता रिकव्हरी रेटच्या बाबतीत हिंदुस्थान अमेरिकेला मागे सारत ‘नंबर वन’वर आला कहे.

जागतिक स्तरावर सर्वाधिक कोरोना रुग्ण असणाऱ्यांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. जगभरातील एकूण रुग्णांपैकी 17 टक्के रुग्ण एकट्या हिंदुस्थानमध्ये आहेत. मात्र देशातील रिकव्हरी रेट 79.28 असून आहे. हे प्रमाण जगभरातील इतर देशांच्या तुलनेत अव्वल आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रायलाने याचे श्रेय केंद्र सरकारच्या मजबूत रणनीतीला आणि कठोर उपायांना दिले आहे.

सप्टेंबरमध्ये सर्वाधिक रुग्ण
दरम्यान, सप्टेंबर महिन्यात आतापर्यंत देशात 16 लाख 86 हजार 769 नवीन कोरोना रुग्ण आढळले असून 21 हजार 150 रूग्णांनी जीव गमावला आहे. गेल्या काही दिवसात दररोज 90 हजारांहून अधिक रुग्ण सापडत आहेत. मात्र सध्या देशात फक्त 19.10 टक्के रुग्ण ऍक्टिव्ह असून मृत्युदर 1.61 टक्के आहे.

एकूण आकडा
देशात आजपर्यंत 53 लाख 8 हजार 14 रुग्ण आढळले असून यापैकी 42 लाख 8 हजार 431 रुग्ण बरे झाले आहेत. गेल्या 24 तासात 1 हजार 247 रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांचा आकडा 85 हजार 619 झाला आहे. तर सध्या 10 लाख 13 हजार 964 ऍक्टिव्ह रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या