कोरोनामुळे गमावली नोकरी; नशिबाने केले मालामाल!

3750

कोरोनाचा फटका जगभरातील अर्थव्यवस्थेला बसला आहे. शेकडो उद्योगधंदे बंद पडले असून लाखो लोकांवर बेरोजगारीची कुऱहाड कोसळली आहे. कोरोनामुळे ब्रिटनमधील शिबू पॉल या हिंदुस्थानी तरुणालाही नोकरी गमवावी लागली आहे. परंतू नव्या नोकरीच्या शोधात असतानाच नशीबाने त्याला सुखद धक्का दिला असून तो एका स्पर्धेचा विजेता ठरला आहे. 2 कोटी रुपयांच्या आलिशान लम्बोर्गिनी कारसह 19 लाख रुपये तो जिंकला आहे.

कोच्चीमध्ये साऊंड इंजिनिअर म्हणून काम करणारा शिबू गेल्याच वर्षी पत्नीसोबत ब्रिटनमध्ये स्थायिक झाला होता. कोरोनामुळे नोकरी गमावल्याने तो चिंतेत होता. काही ठिकाणी त्याने नोकरीसाठी मुलाखती देखील दिल्या. पण त्याचे काम होत नव्हते. या दरम्यान त्याने बेस्ट ऑफ दि बेस्ट ( बीओटीबी) स्पर्धेची 1800 रुपयांची तीन तिकीटे काढली होती. एक दिवस नशीबानेच त्याच्या घराचा दरवाजा ठोठावला. घराबाहेर उभ्या असलेल्या एका व्यक्तीने त्याच्या हातात अलिशान लम्बोर्गिनी उर्स कारच्या चाव्या सोपवल्या आणि सरप्राइज मनी म्हणून 19 लाख रुपयांची रक्कम देखील दिली. या घटनेनंतर त्याच्या आनंदाला पारावर उरला नाही.

आपला आनंद व्यक्त करताना शिबू म्हणाला, नोकरी गमावल्याने त्रस्त असतानाच ही सुखद घटना आयुष्यात घडली आहे. यापूर्वी तीन वेळा मी या स्पर्धेत भाग घेतला होता. पण विजेता होईल असे कधीच काटले नव्हते. घराचे स्वप्न करणार पूर्ण ! दरम्यान, बक्षीस म्हणून मिळालेली आलिशान गाडी शिबूने परत केली आहे. त्याबदल्यात त्याने रोख रक्कम मिळकली आहे. त्यामधून तो नॉटिंघममध्ये हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या