गेल्या 24 तासांत 6977 नवे रुग्ण, 154 जणांचा मृत्यू

604

देशात गेल्या चोवीस तासात कोरोना रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. गेल्या दिवसभरात 6977 कोरोना रुग्ण सापडले असून 154 जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या अहवालानुसार देशात आता कोरोना बाधितांची संख्या 1 लाख 38 हजार 845 इतकी आहे. यातील 4 हजार 21 जण कोरोनामुळे मृत्युमुखी पडले आहेत.

कोरोना होऊन त्यातून बरे झालेल्यांच्या संख्येतही वाढ झाली आहे. कोरोनातून पूर्ण बरे झालेल्यांचा आकडा 57 हजारांवर गेला आहे. सध्या देशात 77 हजार 103 अॅक्टिव्ह केसेस आहेत. महाराष्ट्रातही गेल्या 24 तासांत 3 हजारांहून अधिक रुग्ण सापडले आहेत. त्यातील 1635 जणांचा मृत्यू झाला आहे तामिळनाडू या राज्यात कोरोना बाधित रुग्णांचा आकडा 16 हजारांवर गेला आहे. तर 111 जण मृत्युमुखी पडले आहेत. गुजरात राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा 14 हजार असून 858 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

दुसरीकडे, दिल्ली येथे कोरोना रुग्णांची संख्या 13 हजार 418 झाली आहे. त्यातील 261 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राजस्थानमध्ये रुग्णांची एकूण संख्या 7 हजारांवर गेली आहे आणि 163 जणांचा मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेशमध्ये 6665 रुग्ण आढळले असून 290 जण मृत्युमुखी पडले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या