ब्रह्मोस सुपरसोनिक क्रूज क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी; शत्रूंना धडकी

हिंदुस्थान-चीन सीमेवर तणाव असताना हिंदुस्थानने मोठे यश मिळवले आहे. हिंदुस्थानने बुधवारी ब्रह्मोस सुपरसोनिक क्रूज क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे. हे क्षेपणास्त्र 400 किलोमीटरच्या परिसरातील शत्रूचा खात्मा करण्यास सक्षम आहे. लडाखमध्ये चीनशी तणाव असताना तसेच पाकिस्तानच्या कुरापती सुरू असताना हिंदुस्थानला मोठे यश मिळाले आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने ( डीआरडीओ) बुधवारी ओडिशामध्ये ब्रह्मोस सुपरसोनिक क्रूज क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. हे या क्षेपणास्त्राचे अद्ययावत स्वरुप असून क्षेपणास्त्राची लक्ष्यभेद करण्याची क्षमता 400 किलोमीटरपर्यंत वाढवण्यात आली आहे.

ही चाचणी PJ 10 योजनेतंर्गत करण्यात आल्याचे डीआरडीओने सांगितले. ओडिशातील बालासोरमध्ये बुधवारी ही चाचणी करण्यात आली. ही चाचाणी झाल्यामुळे हिंदुस्थानच्या लष्करी सामर्थ्यात वाढ झाली आहे. या क्षेपणास्त्रासाठी एअरफ्रेम आणि बूस्टर देशातच बनवण्यात आले आहेत. ब्रह्मोसचे हे अद्यायावतीकरण डीआरडीओने रशियाच्या एनपीओएमसोबत केले आहे. लढाऊ जहाज, सागरी क्षेत्र, सागरी तळ, लढाऊ विमाने आणि जमीनीवरून या क्षेपणास्त्राचा मारा करता येणार आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विट करून चाचणी यशस्वी झाल्याबाबत डीआरडीओचे अभिनंदन केले आहे.

हिंदुस्थानच्या तीन रेजिमेंटमध्ये ब्रह्मोस क्षेपणास्त्र आहे. त्यामुळे शत्रूंच्या कोणत्याही कुरघोडींना चोख प्रत्युत्तर देण्यात येणार आहे. चीनसोबत तणाव असताना हिंदुस्थानची क्षेपणास्त्र चाचणी यशस्वी झाल्याने चीन आणि पाकिस्तानला धडकी भरली आहे. या तणावाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य धोका लक्षात घेत हिंदुस्थान आपले सामर्थ्य वाढवत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या