मेहूल चोक्सीविरोधात डोमेनिका न्यायालयात हिंदुस्थानकडून दोन याचिका दाखल

पीएनबी घोटाळ्यातील आरोपी मेहूल चोक्सीविरोधात डोमेनिकामधील न्यायालयात हिंदुस्थानकडून दोन याचिक दाखल करण्यात आल्या आहेत. तसेच अधिकारी डोमेनिका आणि ब्रिटनमधील न्यायालयीन प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहेत. मेहूल चोक्सीचे हिंदुस्थानकडे प्रत्यार्पण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी डोमेनिकामधील न्यायालयात या दोन याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.

डोमेनिकामधील न्यायालयात या याचिका सीबीआय आणि परदेश मंत्रालयाने हिंदुस्थानकडून दाखल केल्या आहेत. डोमेनिकामध्ये अवैधपणे प्रवेश केल्याप्रकरणी चोक्सीविरोधात सोमवारी डोमेनिकातील न्यायालयात सुनावणीला सुरुवात होणार आहे. या सुनावणीवेळी चोक्सीला न्यायालयात हजर राहवे लागणार आहे.

मेहूल चोक्सीचे गुन्हे आणि देशातून त्याने काढलेला पळ याबाबत सीबीआयने याचिका दाखल केली आहे. तर चोक्सीच्या नागरिकत्वाबाबत परदेश मंत्रआलयाने याचिका दाखल केली आहे. या याचिका न्यायालयाने स्विकारल्यास जेष्ठ विधीज्ञ हरीश साळवे सीबीआय आणि परदेश मंत्रलयाची बाजू न्यायालयात मांडणार आहेत.

डोमेनिकातील उच्च न्यायालयाने चोक्सीची जामीन याचिका शुक्रवारी फेटाळली आहे. चोक्सीविरोधातील अवैध प्रवेशाबाबतच्या निर्णय न्यायालयाकडून आल्यावर त्याला डोमेनिकातून तो ज्या देशाच्या नागरिक आहे, तेथे पाठवण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या