मेहबुबा मुफ्तींची लेक म्हणते, हिंदुस्थान आता मुस्लिमांचा राहिलेला नाही

964

हिंदुस्थान आता मुस्लिमांचा देश राहिलेला नाही,असे ट्विट मेहबुबा मुफ्ती यांच्या ट्विटर अकाऊंटवरून करण्यात आले आहे. त्यांच्या या ट्विटमुळे सोशल मीडियात उलटसुलट चर्चा सुरू आहेत. कश्मीरमधून 370 कलम हटवल्यानंतर जम्मू-कश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांना नजरकैदेत ठेवण्यात आले. त्यामुळे त्यांच्या सोशल अकाऊंटस्वर आता त्यांच्या कन्या इल्तिजा जावेद ऑक्टिव्ह आहेत. या अकाऊंटस्वरून त्याच विविध मुद्द्यांवरून आपली मते मांडत आहेत.

नागरिकत्व सुधारणा विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून त्याबाबतची बातमी इल्तिजा यांनी ट्विट केली असून या ट्विटबरोबरच हिंदुस्थान आता मुस्लिमांचा देश राहिला नसल्याचेही म्हटले आहे. कश्मीरबाबतच्या विविध मुद्दय़ांवर इल्तिजा आपली मते मांडत असतात. यावेळी त्यांनी नागरिकत्व सुधारणा विधेयकाबाबत ट्विट करत आपली भूमिका मांडली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या