#Article370 हिंदुस्थान इस्लामपेक्षाही जुना, मुस्लीम धर्मगुरुंनी पाकिस्तानचे कान टोचले

5500

हिंदुस्थानने जम्मू-कश्मीरला विशेष अधिकार देणारे कलम 370 रद्दबातल केल्यापासून पाकिस्तानचा जळफळाट सुरू आहे. अशातच ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध मुस्लीम धर्मगुरु इमाम मोहम्मद तौवहिदी यांनी हिंदुस्थानच्या निर्णयाला पाठिंबा देत पाकिस्तानचे कान उपटले आहे. जम्मू-कश्मीरच नाही तर पाकिस्तान देखील हिंदुस्थानचा भाग आहे. हिंदुस्थान हा इस्लामपेक्षाही जुना आहे हे आपण नम्रपणे मान्य करायला हवे, असे म्हणत इमाम मोहम्मद तौवहिदी पाकिस्तानचे कान टोचले आहे.

हिंदुस्थानने 370 कलम हटवल्यानंतर इमाम मोहम्मद तौवहिदी यांनी ट्वीट केले आहे. कश्मीर कधी पाकिस्तानचा भाग नव्हताच आणि यापुढेही असणार नाही. पाकिस्तान आणि कश्मीर दोन्ही हिंदुस्थानचाच भाग आहे. मुस्लीमांनी हिंदू धर्म सोडून ते इस्लाममध्ये आले असले तरी संपूर्ण भूभाग हा हिंदूंचा असल्याचे सत्य बदलता येणार नाही. हिंदुस्थान हा पाकिस्तानच काय तर इस्लामपेक्षाहून जुना आहे. हे मान्य करायलाच हवे, असे ट्वीट तौवहिदी यांनी केले आहे.

पाकिस्तानला चपराक
याआधीही तौवहिदी यांनी दहशतवादाच्या मुद्द्यावरून पाकिस्तानला चपराक लगावली होती. “पाकिस्तानने त्यांच्या संविधानामध्ये देशातील सर्व नागरिकांना समान हक्क देण्याबद्दल नमूद केले आहे. मात्र तेथील सरकारचे अल्पसंख्यांक समुदायाकडे दूर्लक्ष होताना दिसते. मागील अनेक वर्षांपासून पाकिस्तान हा दहशतवाद्यांचा स्वर्ग झाला आहे. ते दहशतवादाला खतपाणी घालताना दिसतात. पाकिस्तान दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी पाश्चिमात्य देशांकडून लाखो डॉलर्सची मदत घेतात, असा आरोप तौवहिदी यांनी लगावला होता.

आपली प्रतिक्रिया द्या