आंतरराष्ट्रीय चाईल्ड पॉर्न रॅकेटचा पर्दाफाश; सात जणांविरोधात गुन्हा दाखल

790

जर्मन पोलिसांनी आंतरराष्ट्रीय चाईल्ड पॉर्न रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या रॅकेटचे तार हिंदुस्थानाशीही जोडलेले आहेत. याप्रकरणी जर्मन पोलिसांच्या सूचनेनुसार केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (सीबीआय) हिंदुस्थानातील सात जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. हे सर्व आरोपी एक व्हॉट्सअॅप ग्रुपचे सदस्य आहेत. या ग्रुपवर लहान मुलांचे अश्लील फोटो आणि विडिओ शेअर केले जात होते. असा खुलासा जर्मन पोलिसांनी केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जर्मन पोलिसांनी सॅशे ट्रॅप्की नावाच्या एका आरोपीला अटक केली होती. या आरोपीच्या घरी पोलिसांनी छापा टाकल्यानंतर त्यांना अनेक संशयास्पद वस्तू सापडल्या. या कारवाईत चाईल्ड पॉर्नशी संबंधित अश्लील फोटो आणि व्हिडीओ पोलिसांना मिळाले आहेत. आरोपी 29 व्हॉट्सअॅप ग्रुपही चालवत होता. ज्यामध्ये तो ही अश्लील व्हिडीओ सामग्री शेअर करत होता, अशी माहिती पोलिसांच्या तपासादरम्यान उघडकीस आली.

या 29 ग्रुपमध्ये 483 लोकांचा समावेश असून यामध्ये 7 हिंदुस्थानी नागरिक आहेत. विनोत काना, जुहेब अली, खोजेमा एच, राकेश कुमार, अभिषेक कुमार त्रिपाठी, जयदीप रॉय आणि रहीस अशी या सात जणांची नावं आहेत. या सातही जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही. सीबीआय याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या