अण्वस्त्रांमध्ये हिंदुस्थानने पाकिस्तानला टाकले मागे

अण्वस्त्रांच्या बाबतीत हिंदुस्थानने पाकिस्तानला मागे टाकले आहे. स्वीडिश थिंक-टँकच्या अहवालानुसार हिंदुस्थानकडे जानेवारी 2024 पर्यंत 172 अण्वस्त्रs होती, तर पाकिस्तानकडील अण्वस्त्रांची संख्या 170 इतकी आहे. 2023 मध्ये हिंदुस्थानने नव्या अण्वस्त्रांची निर्मिती केली. दुसऱया बाजूला चीन अण्वस्त्र निर्मितीत पुढे आहे. जानेवारी 2024 पर्यंत त्यांच्याकडे तब्बल 500 अण्वस्त्रे होती, अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान, चीनने पहिल्यांदाच त्यांची हाय ऑपरेशनल शस्त्रs अलर्ट मोडवर ठेवली. जानेवारी 2023 पर्यंत चीनकडे 410 आण्विक शस्त्रे होती, जी आता 90 ने वाढली आहेत.

स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिटय़ूटच्या अहवालातून हिंदुस्थानने अण्वस्त्र निर्मितीत पाकिस्तानला मागे टाकल्याचे समोर आले आहे. हिंदुस्थान, चीन आणि पाकिस्तानसह जगभरातील एकूण 9 देशांकडे अण्वस्त्रs आहेत.

90 टक्के अण्वस्त्रे अमेरिका आणि रशियाकडे

जगभरातील अण्वस्त्रांपैकी 90 टक्के अण्वस्त्रs अमेरिका आणि रशियाकडे आहेत. 2023 मध्ये अनेक देशांनी आण्विक सक्षम शस्त्रs तैनात केली. जगभरात तयार केलेल्या 12,121 अण्वस्त्रांपैकी जवळ जवळ 9,585 अण्वस्त्रs संभाव्य वापरासाठी सैन्याच्या शस्त्रागारात ठेवण्यात आली आहेत.