लॉकडाऊनपासून पतीचा आंघोळीला रामराम, रोज करतो सेक्सची मागणी; पत्नीची पोलिसात तक्रार

कोरोना व्हायरसचा वाढता धोका पाहता केंद्र सरकारने संपूर्ण देशात लॉकडाऊन लागू केला आहे. यात नंतर वाढही करण्यात आली. लॉकडाऊनमुळे लहानांपासून थोरांपर्यंत सर्वच घरात अडकून पडले आहेत. काही लोक कुटुंबासोबत मजमस्ती करत आहेत, कुटुंबासोबत वेळ घालवत आहेत. मात्र लॉकडाऊन काळात महिलांवरील अत्याचारात वाढ झाल्याचे दिसून आले आहे. याच दरम्यान बंगळुरूमध्ये एक विचित्रच घटना समोर आली आहे. पोलिसांच्या हेल्पलाईनवर एका महिलेने कॉल करुन आपली तक्रार दाखल केली आहे.

लॉकडाऊनमध्ये महिला अत्याचाराच्या घटनात वाढ झालेली दिसल्याने सरकारने खास हेल्पलाईन नंबर जारी केला आहे. बंगळुरू येथील एका महिलेने पोलिसांच्या परिहार या विशेष हेल्पलाईनवर कॉल करुन आपली तक्रार दाखल केली. पीडित महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले की, लॉकडाऊन सुरु झाल्यापासून तिच्या नवऱ्याने आंघोळ करणेच बंद केले आहे. 24 मार्चपासून पतीने आंघोळ केली नाही आणि तो दररोज सेक्सची मागणी करतो, असे पीडित महिलेने तक्रारीत नमूद केले आहे.

पीडित महिलेचा पती एका किराणाच्या दुकानात काम करतो. मात्र, लॉकडाऊन सुरु झाल्यापासून दुकान बंद आहे आणि तेव्हापासून त्याने आंघोळ करणेही बंद केले आहे. महामारीची साथ असताना स्वच्छता राखणे आणि सॅनिटायझरचा वापर करणे आवश्यक आहे असे वारंवार सांगूनही पती ऐकत नाही. उलट मला मारहाण करतो, असे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या