२००० सीसीची ‘अवन्तुरा चॉपर्स’ लवकरच हिंदुस्थानात येणार

14

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थानात दिवसेंदिवस स्पोर्ट्स बाईक व चॉपर्स बाईकची क्रेझ वाढली आहे. लाखो किमतीच्या बाईक्सना हिंदुस्थानात मागणी देखील वाढत चालली आहे. हीच मागणी लक्षात घेऊन अवन्तुरा या कंपनीने मोटरसायकलप्रेमींसाठी ‘अवन्तुरा चॉपर्स’ ही २००० सीसी इंजिन क्षमतेची बाईक तयार केली आहे. येत्या तीन महिन्यांत ही मोटरसायकल हिंदुस्थानच्या रस्त्यावर धावणार आहे.

‘अवन्तुरा चॉपर्स’ ही बाईक बिस्पोक डिझाइन इंजिनीअरिंग आणि जगातील सर्वोत्तम उत्पादकांसोबत भागिदारी करून तयार करण्यात आली आहे. ओईएम इंजिन, सस्पेन्शन, टायर, ब्रेक, लाइट आणि अगदी सीटसाठी आम्ही जगातील अग्रगण्य कंपन्यांशी करार केले आहेत. इंजिनसाठी अमेरिकेतील एस अॅण्ड एस कंपनी, प्रोमो सिक्स स्पीड ट्रान्समिशनसाठी अमेरिकेतील रिव्हेरा, सस्पेन्शनसाठी अमेरिकेतील प्रोग्रेसिव्ह, कोब्रा टायरसाठी ब्रिटनमधील अव्हॉन, ब्रेक कॅलिपर्ससाठी फ्रान्समधील बेरिंजर, सीटसाठी अमेरिकेतील मुस्टँग, टर्न सिग्नल्ससाठी जर्मनीतील केलरमन या कंपन्यांची मदत घेण्यात आली आहे.

तीन महिन्यात ही बाईक हिंदुस्थानच्या बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध होणार असून याची किंमत तब्बल २० लाख रूपये आहे, असे कंपनीचे सहसंस्थापक विजय सिंग यांनी सांगितले. चॉपर्स बाईकची आवड असणाऱ्यांसाठी ही बाईक एक पर्वणीच ठरणार आहे. या बाईकमधून चॉपरचा पूर्ण अनुभव चालकांना मिळणार आहे, असे देखील सिंग यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या