आशियाई क्रीडा स्पर्धेतील महिला क्रिकेटमध्ये हिंदुस्थान-श्रीलंका यांच्यात अंतिम लढत रंगणार आहे. हिंदुस्थानी महिला संघाला यात सुवर्णपदकाचे दावेदार मानले जात आहे. हिंदुस्थानने बांगलादेशचा आठ गडी राखून पराभव करत अंतिम फेरी गाठली, तर दुसरीकडे श्रीलंकेने पाकिस्तानला हरवून अंतिम फेरीत धडक दिली आहे.
बांगलादेशचा खुर्दा
नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय बांगलादेशच्या चांगलाच अंगलट आला. हिंदुस्थानी गोलंदाजीपुढे सपशेल शरणागती पत्करल्यामुळे बांगलादेशचा 17.5 षटकांत केवळ 51 धावांवरच खुर्दा उडाला. त्यांच्या तब्बल पाच फलंदाजांना भोपळाही फोडता आला नाही. कर्णधार निगर सुल्ताना (12) दुहेरी धावा करणारी श्रीलंकेची एकमेव फलंदाज ठरली. इतर पाच फलंदाज एकेरी धावसंख्येवर बाद झाल्या. हिंदुस्थानकडून पुजा वस्त्राकरने सर्वाधिक 4 फलंदाज बाद केल्या.
हिंदुस्थानचा सहज विजय
बांगलादेशकडून मिळालेले 52 धावांचे लक्ष्य हिंदुस्थानी महिला संघाने 8.2 षटकांत 2 फलंदाजांच्या मोबदल्यास सहज पूर्ण केले. जेमिमा रॉड्रिग्जने सर्वाधिक नाबाद 20 धावा केल्या.
आशियाई क्रीडा स्पर्धा
देश सुवर्ण रौप्य कास्य एकूण
चीन 9 1 0 10
हाँगकाँग 1 0 0 1
हिंदुस्थान 0 3 2 5
उझबेकिस्तान 0 3 1 4
इंडोनेशिया 0 1 3 4
इराण 0 1 0 1
जपान 0 1 0 1
मकाऊ 0 0 1 1
मंगोलिया 0 0 1 1
थायलंड 0 0 1 1
व्हिएतनाम 0 0 1 1