मुंबई, मध्य महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाचा इशारा; काही भागात झाडे कोसळली

1010

देशाच्या हवामान खात्याने विविध भागांसाठी अतिमुसळधार पाऊस, पूर परिस्थितीचा इशारा दिला आहे. गुजरात, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या किनारी भागांना पुराचा जास्त धोका असल्याचा अंदाज केंद्रीय जल आयोगाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

दरम्यान, मुंबईत मुसळधार पावसाला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. काही भागात सोसाट्याचा वारा सुटल्याने झाडे कोसळली आहेत. चर्चगेट वरून सीएसटीला येणाऱ्या मार्गावर मुुंबई जिमखानाजवळ अनेक बसेसवर झाडे उन्मळून पडली आहेत. पोलीस नागरिकांना धोक्याच्या सूचना देत नागरिकांची मदत करत आहे.

दुसरीकडे कोल्हापूर जिल्ह्यात पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या