नौदलाच्या हेलिकॉप्टरचं मुंबईच्या किनाऱ्यावर आपत्कालीन लँडिंग; क्रू बचावले

ALH-Indian-navy

हिंदुस्थानच्या नौदलाच्या एका हेलिकॉप्टरचं आज मुंबई किनारपट्टीवर आपत्कालीन लँडिंग करण्यात आलं. अॅडव्हान्स लाइट हेलिकॉप्टर (एएलएच) दैनंदिन कामकाजात असताना ही घटना घडली. अशाप्रकारे पाण्यावर आपत्कालीन लँडिंगला ‘डिचिंग’ असं म्हणतात.

नौदलाकडून सांगण्यात आले की, ‘ध्रुव’ हेलिकॉप्टरमधील तीन क्रू मेंबर्सना वाचवण्यात यश आले आहे.

‘नौदलाचे हेलिकॉप्टर मुंबईच्या समुद्रकिनाऱ्याजवळ अचानक दिसेनासे झाले. त्यामुळे तात्काळ त्याचा शोध घेण्यासाठी मोहीम राबवण्यात आली आणि बचाव पथकाने नौदलाच्या तीन जणांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले’, असे नौदलाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर म्हटले आहे.

दरम्यान या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.