NEET-UG 2024 : ग्रेस गुण मिळालेल्या 1563 विद्यार्थ्यांची 23 जूनला फेरपरीक्षा

वैद्यकीय प्रवेश परीक्षा नीटच्या निकालाबाबत सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर गुरुवारी सुनावणी घेण्यात आली. या सुनावणीच्या वेळी केंद्र सरकारने ग्रेस गुण मिळालेल्या 1563 विद्यार्थ्यांचे स्कोअरकार्ड रद्द केले जाणार असून त्यांची 23 जूनला फेर परीक्षा घेण्यात येणार असल्याचे सांगितले. सर्वोच्च न्यायालयाने केंद्राचा हा प्रस्ताव मान्य केला आहे.

केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात मांडलेल्या प्रस्तावानुसार ज्यांना ग्रेस गुण मिळाले आहेत अशा 1563 विद्यार्थ्यांची 23 जूनला फेरपरिक्षा घेण्यात येईल. या परिक्षेचा 30 जूनपूर्वी निकाल जाहीर केला जाईल. त्यामुळे जुलै महिन्यात होणाऱ्या समुपदेशनावर कोणताही परिणाम होणार नाही.