इंडिया ओपन : अंतिम सामन्यात सिंधूचा अमेरिकेच्या बेईवान झांगनेतकडून पराभव

9

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

अमेरिकेच्या बेईवान झांगने अंतिम सामन्यात पी.व्ही. सिंधूचा पराभव करत इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेचं जेतेपद पटकावलं आहे. तासभर रंगलेल्या अटीतटीच्या सामन्यात झांगने सिंधूचा २१-१८, ११-२१, २२-२० असा तीन सेटमध्ये पराभव केला. गेल्या वर्षी या स्पर्धेचं जेतेपद सिंधून पटकावलं होतं. बेईवाननं पहिल्यांदा या स्पर्धेचं जेतेपद पटकावलं आहे.

सिंधूनं या सामन्यात पहिला सेट हरल्यानंतर पुन्हा एकदा सामन्यात वापसी केली होती. दुसरा सेट ११-२१नं जिंकत सिंधू सामन्यात परत आली. तिसऱ्या सेटमध्ये धमाकेदार कारगिरी करत सिंधू सामना आपल्या नावे करेल असे वाटत होते मात्र तसं काही झालं नाही. सामन्याच्या शेवटच्या आणि निर्णायक सेटमध्ये दोन्ही खेळाडू २०-२० असा बरोबरीत होते. मात्र बेईवाननं त्यानंतर दोन पॉईंट घेत २२-२०नं तिसरा सेट आणि सामना जिंकला. त्यामुळे सलग दुसऱ्यांदा इंडिया ओपन जेतेपदावर सिंधूला नाव कोरता आलं नाही. बेईवाननं याआधी फ्रेंच ओपनमध्ये सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवला होता आणि ती तिची सर्वोत्तम कामगिरी होती.

आपली प्रतिक्रिया द्या