शोएबची निधीसाठी हिंदुस्थानकडे याचना, PCB म्हणतेय, ‘आम्ही BCCI शिवाय जगू शकतो’, पण…

1965

हिंदुस्थान आणि पाकिस्तान या देशात कोरोना वेगाने पसरत आहे. हिंदुस्थानने कोरोनाचा सामना करण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या आहेत, मात्र पाकिस्तानात परिस्थिती बिकट आहे. त्यामुळे निधी गोळा करण्यासाठी पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने द्विपक्षीय मालिका खेळवण्यात यावी असे म्हंटले होते. यावरून कपिल देव यांनी त्याला झापले देखील होते. आता या वादात पाकिस्तान क्रिकेट बोर्डानेही ( PCB) उडी घेतली आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डा अध्यक्ष एहसान मणी म्हणाले की, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआय बेभरवशी आहे. पाकिस्तानचे क्रिकेट त्यांच्यावर अवलंबून नाही. द्विपक्षीय मालिका झाली, तर चांगलेच आहे. मात्र तोपर्यंत आयसीसी स्पर्धेत त्यांचा मुकाबला करतो, हेच पुरेसं आहे. आम्हाला क्रिकेटमध्ये रस आहे आणि क्रिकेट व राजकारण आम्ही वेगळेच ठेवतो, असेही ते म्हणाले.
एहसान मणी यांनी याबाबत ट्विट केले आहे.

दुसऱ्या एका ट्विटमध्ये ते म्हणतात, हिंदुस्थानविरुद्ध मालिका न होण्याचा फटका आम्हाला नक्की बसतो, परंतु आम्ही त्याचा विचार करत नाही. त्यांच्याशिवाय आम्ही जगू शकतो, आम्हाला जीवंत राहण्यासाठी त्यांची गरज नाही, असेही ते पुढे म्हणाले.

दोन्ही देशात गेल्या सात ते आठ वर्षात एकही द्विपक्षीय मालिका झालेली नाही. दोन कट्टर प्रतिस्पर्धी फक्त आयसीसीच्या स्पर्धा आणि आशिया कपमध्ये आमनेसामने आले आहेत.

पैशाचे आमिष आम्हाला दाखवू नको, कपिल देव यांनी पाकिस्तानच्या शोएब अख्तरला झापले

आपली प्रतिक्रिया द्या