निजामाचा खजिना हिंदुस्थानच्या मालकीचा

1036

हैदराबादच्या सातव्या निजामच्या 3 अब्ज रुपयांपेक्षा जास्त रकमेचा खजिना हडप करण्याचा पाकडय़ांचा डाव उधळला गेला. लंडनच्या बँकेत जमा असलेली ही रक्कम हिंदुस्थानच्या मालकीची आहे असा महत्त्वपूर्ण निर्णय ब्रिटनच्या उच्च न्यायालयाने दिला. यामुळे पाकिस्तानला जोरदार झटका बसला आहे. गेली 70 वर्षे हा खटला ब्रिटनमध्ये सुरू होता.

ब्रिटन उच्च न्यायालयाने निकाल दिला तेव्हा निजामाचे वंशज प्रिन्स मुकर्रम जाहा आणि त्यांचे लहान भाऊ मुफ्फखम जाहा हे हिंदुस्थानच्या बाजूने होते. फाळणीच्या वेळी हैदराबादचा शेवटचा आणि सातवा निजाम मीर उस्मान अली खान याने लंडनच्या नेटवेस्ट बँकेत 1007940 पौंड म्हणजे सुमारे 8 कोटी 87 लाख रुपये जमा केले होते. आता व्याज वाढवून ही रक्कम 3 अब्ज 8 कोटी 40 लाख रुपये एवढी झाली आहे. पाकिस्तानने या रकमेवर दावा केला होता. यावर आज निर्णय देताना लंडनच्या रॉयल कोर्ट ऑफ जस्टीसचे न्यायमूर्ती मार्कस स्मिथ यांनी या रकमेचे दावेदार हिंदुस्थान आणि निजामाचे वंशज आहेत असे स्पष्टपणे म्हटले आहे. कोर्टाने 7 व्या निजामाच्या वंशजांना उत्तराधिकारी म्हणून स्वीकारले आहे. 1948 पासून हा खटला प्रलंबित होता असे निजामाच्या वतीने बाजू मांडणारे वकील पॉल हेविट यांनी म्हटले आहे.

आजच्या निकालाने आम्ही आनंदी आहोत. निजामाचा संपत्तीवरील मालकी हक्क सिद्ध झाला आहे. 1948 सालापासून हा काद सुरू होता. हा काद सुरू झाला तेक्हा माझे अशील खूप लहान होते. आता ते 80 कर्षांचे आहेत. त्यांच्या हयातीत हा काद सुटला ही मोठी समाधानाची बाब आहे. – ऍड. पॉल हेविट, निजामाचे वकील

निजामाला पाकचा पुळका होता

हैदराबाद संस्थान खालसा झाले. हिंदुस्थानात सामील झाले, मात्र सातव्या निजामाला पाकिस्तानचा पुळका होता. पाकिस्तानला पैशांची कमतरता होती. पाकचा डोळा निजामाच्या संपत्तीवर होता. निजामाने ब्रिटनमधील पाकचे तत्कालीन उच्चायुक्त हबीब इब्राहिम रहिमतेला यांच्या बँक खात्यावर पैसे पाठविले, मात्र हिंदुस्थानने यास आक्षेप घेतला. निजामाचे वंशजही हिंदुस्थानी समर्थक होते. हे प्रकरण 1948 ला कोर्टात गेले. 70 वर्षे खटला सुरूच होता. अखेर पाकडय़ांना निजामाचा खजिना मिळाला नाही. खटल्याचा निकाल हिंदुस्थानच्या बाजूने लागला.

आपली प्रतिक्रिया द्या