हिंदुस्थान-पाकिस्तान डेव्हिस कप लढत नोव्हेंबरपर्यंत स्थगित

275

हिंदुस्थान व पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये होणारी डेव्हिस कप एशिया/ओसियाना गट टेनिस लढत नोव्हेंबरपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. पाकिस्तानमधील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतल्यानंतर आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाने (आयटीएफ) गुरुवारी हा निर्णय घेतला.

उभय संघांत इस्लामाबादमध्ये 14 ते 15 सप्टेंबरदरम्यान डेव्हिस कप लढत रंगणार होती. मात्र हिंदुस्थानने जम्मू-कश्मीरमधील 370 कलम रद्द केल्यानंतर त्याचे तीक्र पडसाद पाकिस्तानमध्ये उमटले. या घटनेमुळे दोन्ही देशांतील संबंध अधिक ताणले गेले.

हिंदुस्थान-पाकिस्तानदरम्यान होणाऱया डेव्हिस कप लढतीसाठी पाकिस्तानातील सद्य परिस्थिती अनुकूल नाही. कुठल्याही स्पर्धेत खेळाडूंच्या सुरक्षेला प्राधान्य दिले जाते. त्यामुळे उभय देशांमधील ही स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता नोव्हेंबरमध्ये पुन्हा पाकिस्तानमधील सुरक्षेचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल.- आयटीएफ

आपली प्रतिक्रिया द्या