लोकप्रियतेत पंतप्रधान मोदी पहिल्या स्थानावर; धोनीने तेंडुलकर, कोहलीला मागे टाकले

554
pm-modi-15-aug-2019-new
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 69 वा वाढदिवस आहे.

हिंदुस्थानात आजघडीला सर्वात जास्त लोकप्रिय ठरले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी. हिंदुस्थानसह तब्बल 41 देशांमधील लोकप्रिय व्यक्तींची पाहणी ‘यूगोव्ह’ या एका एजन्सीने केली. त्यात पंतप्रधान मोदी 15.66 टक्क्यांनी देशात नंबर वन ठरले असून क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी हा तेंडुलकर आणि कोहली यांना मागे टाकत दुसऱ्या क्रमांकावर आहे.

या सर्वेक्षणात धोनीला 8.58 टक्के गुण मिळाले आहेत. विशेष म्हणजे याच सर्वेक्षणात मास्टरबास्टर सचिन तेंडुलकर 5.81 टक्के गुण मिळवत सातव्या, तर 4.46 टक्के गुण मिळवत विराट कोहली आठव्या स्थानावर आहे. ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांना 8.02 टक्के गुण मिळाले असून सर्वेक्षणात ते देशातील तिसरे लोकप्रिय व्यक्ती ठरले आहेत. महिलांमध्ये सर्वांत लोकप्रिय ठरण्याचा मान मेरी कोम (10.36 टक्के) हिने पटकावला असून त्यानंतर किरण बेदी (9.46 टक्के) यांचा नंबर आहे.

लतादीदी तिसऱ्या स्थानावर

गानसम्राज्ञी लता मंगेशकर महिलांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकाच्या लोकप्रिय व्यक्ती ठरल्या आहेत. त्यांना 9.23 टक्के गुण मिळाले आहेत तर नोबेल शांती पुरस्कारविजेती पाकिस्तानची मलाला युसूफझाई देशात 5.75 टक्के मिळवत महिलांमध्ये सहाव्या स्थानावर आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची पत्नी मिशेल ओबामा हिंदुस्थानात 5.53 टक्के गुण मिळवत सातव्या स्थानावर आहे.

आपली प्रतिक्रिया द्या