गेल्या 24 तासातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 25 हजारांच्या जवळ, मृतांचा आकडाही धक्कादायक

1656

गेल्या 24 तासात देशात 24,850 कोरोनाग्रस्त आढळले असून ही आकडेवारी आतापर्यंतची सर्वात मोठी आकडेवारी आहे. हा वाढता आकडा चिंताजनक असून सध्या हिंदुस्थान जगात चौथ्या क्रमांकावर आहे. हिंदुस्थान व तिसऱ्या क्रमांकावरील रशियामध्ये फक्त एक हजार रुग्णांचा फरक आहे.

हिंदुस्थानात गेल्या 24 तासात 613 जणांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत 19268 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. देशात सध्या 6,73,165 कोरोनाग्रस्त असून त्यात 4,09,083 कोरोनाग्रस्त हे बरे झाले असून 2,44,814 कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहेत.

देशात गेल्या 24 तासात 2,48,934 चाचण्या करण्यात आल्या असून 4 जुलैपर्यंत देशात 97,89,066 चाचण्या करण्यात आल्या होत्या. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने याबााबत माहिती दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या