धक्कादायक! दहा हजाराच्या जवळ पोहोचला एका दिवसातील कोरोनाग्रस्तांचा आकडा

808

हिंदुस्थानात गेल्या 24 तासात कोरोनाग्रस्तांचा आकडा 9971 ने वाढला आहे. ही आतापर्यंतची एका दिवसातली सर्वात मोठी वाढ असून सलग चौथ्या दिवशी कोरोनाग्रस्तांच्या संख्येत 9 हजाराहून अधिकची वाढ झाली आहे. या वाढीसोबतच हिंदुस्थान कोरोनाग्रस्त देशांच्या यादीत पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. हिंदुस्थानने कोरोनाग्रस्तांच्या संख्येत इटली व स्पेनला देखील मागे टाकले आहे.

देशात सध्या 2,46,628 कोरोनाग्रस्त असून त्यातील 1,20,406 रुग्ण हे अॅक्टिव्ह आहेत. तर 1,19,293 रुग्ण हे कोरोनामुक्त झाले आहेत. देशात कोरोनामुळे आतापर्यंत 6929 जणांचा मृत्यू झाला आहे. यातील 287 मृत्यू हे गेल्या 24 तासात झाले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या