हिंदुस्थान-रशियाच्या या पावलामुळे पाकिस्तानसह अमेरिकेतही खळबळ, वाचा सविस्तर…

3244

पाकिस्तान आणि चीन यासारखे दोन कुरापती राष्ट्र शेजारी असल्याने हिंदुस्थान आपल्या लष्कराचे सामर्थ्य वाढवण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहे. याच अनुषंगाने हिंदुस्थान आणि रशियामध्ये हवाई दलाला मजबूत करण्यासाठी मोठा करार झाला. या कराराअंतर्गत जमिनीवरून हवेत मारा करणारी एस-400 क्षेपणास्त्र प्रणाली हिंदुस्थानच्या हवाई दलाला मिळणार आहे. हवेतल्या हवेत शत्रूराष्ट्राच्या विमानांना आणि क्षेपणास्त्रांना ध्वस्त करण्याची क्षमता यामध्ये आहे. हिंदुस्थान-रशियामधील या करारामुळे पाकिस्तानसह अमेरिकेतही खळबळ उडाली आहे.

एस-400 ही मिसाईल सिस्टीम जगभरात फक्त अमेरिका आणि रशिया या दोन राष्ट्रांकडे आहे. आता हिंदुस्थानकडेही एस-400 क्षेपणास्त्र प्रणाली येणार आहे. रशियाच्या एस-400 चा मिसाईल सिस्टीम प्रणालीपासून अमेरिकेसह नाटोही दबकून आहे. कारण सीरिया युद्धादरम्यान रशियाने ही मिसाईल सिस्टीम मैदानात उतरवली होती. यामुळे नाटो आणि अमेरिकेच्या लढाऊ विमानांना आपले ठिकाण बदलावे लागले होते.

s400

हिंदुस्थान आणि रशियातील एस-400 क्षेपणास्त्र प्रणालीचा कराराची संभाव्य किंमत 5.5 बिलियन डॉलर अर्थात 36 हजार कोटी रुपये आहे. दोन देशांमध्ये झालेल्या या कराराअंतर्गत रशिया हिंदुस्थानला पाच एस-400 अँटी मिसाईल डिफेन्स सिस्टीम, 40 हेलिकॉप्टर, आणि 200 मामोव-केए-226-टी हेलिकॉप्टर देणार आहे. 2020 पर्यंत याची डिलिव्हरी होणे अपेक्षित आहे.

काय आहे एस-400 क्षेपणास्त्र प्रणाली?
एस-400 ही जगातील अत्याधुनिक क्षेपणास्त्र प्रणाली असून, या प्रणालीमध्ये शत्रूच्या विमानांना अचूकरीत्या लक्ष्य करण्याचे सामर्थ्य आहे. एस-400 ला रशियाची अत्याधुनिक लांब पल्ल्यातील जमिनीवरून हवेत मारा करणारी मिसाईल डिफेन्स सिस्टीम मानले जाते. ही प्रणाली शत्रूची क्रूझ, विमाने आणि बॅलेस्टिक मिसाईल टिपण्यात सक्षम आहे. ही प्रणाली रशियाच्याच एस-300 प्रणालीचे आधुनिक रुप आहे.

आपली प्रतिक्रिया द्या