चिंताजनक! सलग तिसऱ्या दिवशी देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी वाढ

गेल्या तीन दिवसांपासून देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सलग तिसऱ्या दिवशी देशात सहा हजाराहून अधिक कोरोनाग्रस्त आढळले आहेत. गेल्या 24 तासात कोरोनाग्रस्तांचा आकडा 6767 ने वाढला आहे तर 147 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. दिवसेंदिवस वाढणारी कोरोनाग्रस्तांची संख्या देशासाठी चिंतेची बाब ठरली आहे.

गेल्या 24 तासात देशात 6767 कोरोनाग्रस्त आढळले असून एकूण रुग्णांचा आकडा 131868 वर पोहोचला आहे. यात 77427 हे अॅक्टिव्ह रुग्ण असून 54441 रुग्ण बरे झाले आहेत. तर 3867 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात शनिवारी 6654 रुग्णांची नोंद झाली होती तर शुक्रवारी हा आकडा 6081 होता. सलग तीन दिवस होणारी ही वाढ आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ ठरली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या