कश्मीरबाबत पाकिस्तानची खोटी कॉमेंट्री सुरू आहे; हिंदुस्थानची चपराक

667

संयुक्त राष्ट्रात मानवाधिकार आयोगासमोर जम्मू-काश्मीरचा मुद्दा उपस्थित करणाऱ्या पाकिस्तानला हिंदुस्थानने सणसणीत चपराक लगवाली आहे. कश्मीरबाबत पाकिस्तानची खोटी कॉमेंट्री सुरू आहे. कश्मीर हा हिंदुस्थानचा अंतर्गत मुद्दा असून त्यात कोणीही दखल देण्याची गरज नाही. कश्मीरमध्ये मानवी हक्कांची पायमल्ली होत असल्याचा कांगावा म्हणजे पाकिस्तानची खोटी कॉमेंट्री आहे. त्यांच्या केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. हिंदुस्थान कश्मीरच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचेही हिंदुस्थानकडून स्पष्ट करण्यात आले.

हिंदुस्थानने पाकिस्तानचे सर्व आरोप खोडून काढले आहेत. पाकिस्तान खोटेनाटे आरोप करत असून काश्मीरबद्दल संविधानाच्या चौकटीत राहून योग्य निर्णय घेतला आहे, असे परराष्ट्र मंत्रालायच्या सचिव (ईस्ट) विजय ठाकूर सिंह यांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत सांगितले. सामाजिक, आर्थिक समानता आणि न्याय मिळवून देण्यासाठी आमचे सरकार योग्य निर्णय घेत आहे असे सिंह म्हणाल्या. आपच्या अंतर्गत विषयांमध्ये कोणाचाही हस्तक्षेप सहन करणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. पाकिस्तान खोटे आरोप करत असून प्रदेशातील जनतेच्या मानवी हक्काच्या संरक्षणासाठी सरकार कटिबद्ध आहे असे सिंह यांनी सांगितले. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाने जम्मू-काश्मीरचे नुकसान केल्याकडे त्यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष वेधले. पाकिस्तान दहशतवादाचे प्रमुख केंद्र असल्याचेही त्या म्हणाल्या.

आपली प्रतिक्रिया द्या