आजच्या सामन्यात धोनी १० हजार धावांचा टप्पा गाठू शकेल?

13

सामना ऑनलाईन । विशाखापट्टणम

श्रीलंकेविरुद्धच्या शेवटच्या आणि निर्णायक एकदिवसीय सामन्यात विजय मिळवणं हे हिंदुस्थानी संघाचं लक्ष्य असेल. विशाखापट्टणम येथील मैदानावर हिंदुस्थानी संघाचा रेकॉर्डही चांगला आहे. विराट कोहली संघात नाही, मात्र रोहितनं झळकावलेलं द्विशतक अजूनही क्रिकेटप्रेमी विसलेले नाहीत. त्यामुळे आजच्या सामन्यातही रोहितवर मोठी जबाबदारी असणार आहे. मात्र महेद्रसिंह धोनीवरही चाहत्यांचे लक्ष असणार आहे.

धोनीला त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील १० हजार धावा पूर्ण करण्यासाठी १०२ धावांची आवश्यकता आहे. त्यामुळे या सामन्यात धोनी १० हजार धावांचा पल्ला गाठेल अशी त्याच्या चाहत्यांना अपेक्षा आहे. धोनीने १० हजारांच्या पल्ला गाठल्यास असं करणारा तो चौथा हिंदुस्थानी तर १२वा आंतरराष्ट्रीय खेळाडू ठरणार आहे. याआधी सचिन तेंडुलकर (१८,४२६ धावा), सौरभ गांगुली (११,३६३ धावा), राहुल द्रविड (१०,८८९) यांनी हिंदुस्थानकडून खेळताना हा पराक्रम केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या