सुपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

सामना ऑनलाईन । बालासोर

हिंदुस्थानने सुपर पॉवर बनण्याच्या दिशेने आज महत्त्वाचे पाऊल टाकले. ओडिशातील बालासोर येथे आज सुपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली. हिंदुस्थानच्या दिशेने येणा-या कोणत्याही क्षेपणास्त्राचा हवेतच खात्मा करण्याची क्षमता या क्षेपणास्त्रात आहे. अशा प्रकारचे क्षेपणास्त्र बाळगणारा हिंदुस्थान हा जगातील चौथा देश ठरला आहे.

ओडिशातील बालासोर येथे आज हिंदुस्थानने सुपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. या क्षेपणास्त्राची वर्षभरात करण्यात आलेली ही तिसरी चाचणी आहे. यापूर्वी ११ फेब्रुवारी व १ मार्च रोजी अशा प्रकारची चाचणी घेण्यात आली होती. पृथ्वीच्या वायुकक्षेत ३० किमीच्या उंचीवरून येणारे कोणतेही क्षेपणास्त्र नष्ट करण्याची क्षमता या क्षेपणास्त्रात आहे.

क्षेपणास्त्राचा मारा करून क्षेपणास्त्र नष्ट करण्याची क्षमता आतापर्यंत केवळ अमेरिका, रशिया तसेच इस्रायलकडेच होती. हिंदुस्थान आता या पंक्तीत जाऊन बसला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या