अंगाची होणार लाही लाही, राज्यात उष्णतेच्या लाटांचा इशारा; तापमान 40 अंशाच्या पार जाण्याची शक्यता

सध्या वैशाख वणव्यामुळे नागरिक हैराण झाले आहे. दुपारी घराबाहेर पडले की अंगाची लाही लाही होते. मार्च महिन्यात उकाड्याने लोकांना नकोसे केलेले असताना आता पुढील दोन महिने तर आणखीनच हालत खराब होणार अशी परिस्थिती आहे. हवामान खात्याने येत्या दोन महिन्यात तापमान हे 40 अंश सेल्सियस पार जाणार आहे. तसेच एप्रिल ते जूनदरम्यान बऱ्याचदा उष्णतेची लाट येऊ शकते असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

देशाच्या अनेक भागांमध्ये उन्हाचा तडाखा बसायला सुरुवात झालीच आहे. बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, ओडीशा, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, महाराष्ट्र, गुजरात, पंजाब आणि हरयाणा या राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचे दिवस लक्षणीयरीत्या अधिक असतील असा अंदाज हवामानतज्ञ मृत्युंजय महापात्रा यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे. त्याच बरोबर कमाल तापमानाचा पारा चाळीशीपार जाण्याचा अंदाजही व्यक्त केला आहे. दरम्यान एप्रिलमध्ये देशातील काही राज्यांमध्ये पावसाची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Above normal heatwave days are likely to occur over most parts of central India, east India and northwest India during the hot weather season April to June 2023.@DDNewslive pic.twitter.com/AoRerEzZCy

जम्मू आणि कश्मीर, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, केरळ आणि कर्नाटकचा किनारी प्रदेश हा द्वीपकल्पीय भाग सोडल्यास ईशान्य, पूर्व, मध्य हिंदुस्थानात आणि उत्तर पश्चिम हिंदुस्थानात कडक उन्हाळ्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.