चावट कुठले! या ‘कामा’तही दिल्लीकर टॉपवर

6196
sex-city

‘सेक्स’ हा तसा खासगी विषय. यामुळे यावर सार्वजनिकरित्या बोलणे तसे कठीणच. पण आताशा कुठे लोकं या विषयावर मोकळेपणाने बोलू लागले आहेत. इंडिया टुडेने याच विषयावर काही दिवसांपूर्वी सर्व्हे केला होता. यात सेक्सवर बोलण्यास मागेपुढे करणारे दिल्लीकर प्रत्यक्षात ते कृतीत आणण्यात मात्र इतर राज्यांपेक्षा पुढे असल्याचे समोर आले आहे. त्यातही ऑफिस किंवा त्याच्या आजूबाजूच्या परिसरात सेक्स करण्याची दिल्लीकरांना भारीच हौस असल्याचंही स्पष्ट झालं आहे.

दिल्लीत 28 टक्के लोकांनी ऑफिस व त्याच्या आजूबाजूच्या परिसरात गर्लफ्रेंडबरोबर सेक्स एन्जॉय केल्याचं सांगितले. तर दिल्लीनंतर छोटे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रांचीतले लोक कामुक असल्याचं सर्व्हेत म्हटले आहे. येथील 19.5 लोकांनी ऑफिसमध्येच बऱ्याचवेळा ‘कारभार’ आटोपल्याचं स्पष्ट केलं आहे.

नोएडामधील 100 टक्के लोकांनी ऑफिस व त्याच्या परिसरात सेक्स कधीही केलेला नाही असे सांगितले आहे. तसेच इंदुर, कोलकाता, चंदीगडमधील 99 टक्के लोकांनी ऑफिसमध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित केलेले नाही असे सांगितले. तर लखनौमध्ये 48 टक्के, चेन्नई 42 टक्के  आणि गुरुग्राममधील 43 टक्के लोकांनी ऑफिसमध्ये सेक्स केला नसल्याचे सांगितले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या